पराग डोभळे, साम टाव्ही
चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता काबीज करण्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार धुरंधर ठरले. एकीकडे काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे वाद सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित करत काँग्रेसचा तोंडाशी आलेला घास हा हिसकावून घेतला. खरं तर याला काँग्रेसच जबाबदार आहे. हे करत असताना पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडल्या याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधत अनेक गौप्यस्फोट केले.
ते म्हणाले की, दोन दिवस अगोदर उबाठासोबत चर्चा केली होती. काँग्रेस नेते राहुल पुगलिया यांच्या घरात पहिली बैठक झाली, यामध्ये त्यांनी मदत केली. सुधीर भाऊच विकास करू शकत असल्याने सर्व सोबत आहे. तसेच उपेंद्र कोठेकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे देखील चर्चेत होते. पहिला महापौर भाजपचा असावा अशी अट आम्ही दिली.
पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भारतीय जनता पक्षात अनुशासन प्रिय असताना सुद्धा AB फॉर्म चोरी गेली. एक वार्डात दोन ते तीन फॉर्म वाटले. या गटबाजीमुळे हा प्रकार घडला. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट आहेच हे काय लपवण्यासारखे नाही हे सगळ्यांनी बघितले असे ते म्हणाले.
हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याचा निर्णय मी घेतला होता. वेद हे पवित्र ग्रंथ मानले जातात. एका कवीने वर्णन करताना वेदमंत्रांपेक्षाही ‘वंदे मातरम’ अधिक पवित्र असल्याची भावना मांडली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. ‘गर्जा महाराष्ट्र’ हे स्वागतगीत म्हणून स्वीकारण्यात आले, याचा मला विशेष आनंद आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय कार्यक्रमात त्या गीतासाठी उभे राहावे लागते. ही महाराष्ट्राच्या संविधानिक परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.