राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय.... महाविकास आघाडीनं तीन जागांवर महायुतीला धूळ चारल्यानं मित्रपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत.. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडल्यानं आता शिंदेसेनेचे आक्रमक नेते निलेश राणेंनी बन यांना काय थेट इशारा दिलाय ते एका
दुसरीकडे महायुतीतील संघर्ष फक्त बन-राणेंपूरता मर्यादित राहिला नाही... विधानपरिषद निकालावरून धंगेकरांनी भाजपलाच जबाबदार धरल्यानंतर आणि थेट एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीनंतर भाजप नेते आक्रमक झालेत... त्यांनी थेट युतीधर्माबद्दलच विचार करावा लागेल, असा इशारा दिलाय...
या संपूर्ण वादानंतर महायुतीमधील समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. निवडणुकीतील पराभवानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी पक्षाचे प्रवक्ते परस्परविरोधी विधाने करून महायुतीमध्ये वितुष्ट आणत असल्याचा सूर आता उमटू लागलाय..प्रविण दरेकर यांच्यासह इतर नेत्यांनीही युतीत राहण्याबाबत आणि समन्वयाबाबत भाजपला गांभीर्याने विचार करावा लागेल, असे संकेत दिलेत.. राष्ट्रवादीच्या मुश्रीफांनीही सत्तारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं नाराजी व्यक्त केलीय...त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील हा अंतर्गत तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय...त्यामुळे 2029 पर्यंत महायुती टिकणार का? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात विचारला जातोय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.