
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत. भाजपनेही तयारी सुरू केलीय. निवडणुकीच्या संदर्भात भाजप खासदार नारायण राणेंनी मोठं विधान केलंय. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवले इतकी भाजपची मुंबईत ताकद असल्याचं म्हटलंय. त्यामुळे भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू झाली आहे , का असा सवाल राजकीय वर्तुळात होत आहे.
यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्यावेळी भाजप दोन्ही मित्र पक्षांना बाजुला सारणार अशी चर्चा रंगू लागलीय. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लान तयार केलाय. या निवणुकीसाठी भाजपने महाविजय 3.0 चे नियोजन केलंय. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवण्यासाठी भाजपने प्लान तयार केलाय. मुंबईतही भाजपला स्वबळावर निवडणूक लढवण्याची आहे.
खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलतांना भाजपची मीमांसा बोलून दाखवली. राणेंच्या विधानामुळे महायुतीत फुट पडणार का असा सवालही केला जात आहे. पुढील काळात भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल, असं विधान नारायण राणेंनी केलंय.
भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू, पण कोणती हे सांगू शकत नाही. राज्यातील विधानसभेची का लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढू हे सांगत नाही.
पण आज आमचा पक्ष राज्यात आणि देशात मोठा पक्ष आहे. आमचा पक्ष भक्कम आणि मजबूत व्हावा यासाठी आम्ही सदस्य नोंदणी करत आहोत, अधिक सदस्य नोंदणीतून आम्ही मोठा पक्ष आहोत हे आम्ही दाखवून देत आहोत असं नारायण राणे म्हणाले. भाजपचे चांगले दिवस आहेत. त्याचे तुम्ही स्वागत केलं पाहिजे. लोकांना विकास दिसत आहे. त्यामुळे पक्षप्रवेश होत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवले इतकी भाजपची मुंबईत ताकद असल्याचं राणे म्हणाले.
रविवारी भाजपच्या राज्य अधिवेशन होणार आहे. शिर्डीमध्ये होणाऱ्या अधिवेशनाला येण्यापूर्वी राज्यभरातील प्रतिनिधींना प्रत्येकी २५० सदस्यांची नोंदणी करण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आज रत्नागिरीत नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखील सदस्यांची नोंदणी करण्यात आली. दरम्यान पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेची संख्या १.१ कोटी असून १.५ कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजपच्या श्रेष्ठींनी दिलंय.
११ कोटी सदस्यांसह भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.भाजप १० जानेवारी रोजी 'घर चलो मोहीम' राबवणार आहे. भाजपने मोबाईल नंबर जारी केलाय. यावरून नोंदणी केली जाईल. मिस्ड कॉल देऊन ही डिजिटल नोंदणी करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.