मराठी विरुद्ध अमराठी वादात आणखी एका भाजप खासदारानं उडी घेतलीय..तर मराठी अस्मितेला नख लावणाऱ्या मग्रुर परप्रांतिय व्यापाऱ्यांना समजवण्याऐवजी ब्रिजभुषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंनाच आव्हान दिलंय..एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी मदत केल्याचा दावा करुन ब्रिजभुषण सिंह यांनी खळबळ उडवून दिलीय...
पावसाळ्यात उंदराने बिळातून बाहेर पडावं त्याच प्रकारे परप्रांतियांकडून मराठीविरोधात गरळ ओकण्याची मालिका सुरु आहे... त्यासंदर्भात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिलेत...
तर राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मिरा रोडला परप्रांतिय व्यापाऱ्याला मारहाण केली...
त्यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतिय वाद पेटला... तर या वादात आता ब्रिजभुषण सिंह यांनी भाषेचा वाद टाळायला हवा, असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षपणे राज ठाकरेंना ललकारलंय...
खरंतर 2008 मध्ये मनसेने उत्तर भारतीयांविरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे ब्रिजभुषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता... आता पुन्हा एकदा मनसेने मराठी अस्मितेला नख लावणाऱ्या परप्रांतियांविरोधात आंदोलन छेडलंय... त्यामुळे भाषेवरुन पेटलेला वाद ब्रिजभुषण सिंह यांच्या आव्हानानंतर आणखी पेटणार की भाजप ब्रिजभुषण सिंह यांना लगाम घालणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.