
पुणे, नागपूर व संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार उभे करणार
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जबाबदाऱ्यांचे वाटप केले
संजय केनेकर, सुधाकर कोहळे व राजेश पांडे यांच्यावर मोठी जबाबदारी
सदस्य नोंदणी मोहिमेसाठी संघटनात्मक तयारी वेगाने सुरू
गणेश कवडे, साम टिव्ही
राज्यातील आगामी पदवीधर मतदारसंघात निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे. पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदवीधर निवडणुकांसाठीही मास्टरप्लॅन आखला जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. नुकतंच जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. आमदार संजय केनेकर यांच्यावर संभाजीनगर मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरसाठी सुधाकर कोहळे, तर, पुण्यासाठी राजेश पांडे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच सदस्या नोंदणी मोहिमेसाठी या तिन्ही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. भाजपने यासाठी संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आढावा बैठकांचा जोर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप मैदानात उतरली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम कामाला लागले आहेत. भाजपकडून महायुतीसह स्वबळाची ही चाचपणी सुरू आहे.
मंत्री आशिष शेलारांसोबत साटमांकडून कोअर कमिटीच्या बैठका सुरू आहेत. अलिकडेच उत्तर मध्य मुंबई जिल्हा कोअर कमिटी बैठक संपन्न झाली. दररोज एक लोकसभा जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील सहा लोकसभानिहाय कोअर कमिटीच्या बैठका होणार आहेत.
बैठकीत काय रणनिती..?
जिल्ह्यातील प्रत्येक वॉर्डमधील परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे. सध्या भाजपची वॉर्डमध्ये काय ताकद आहे?, तसेच महायुती म्हणून काय ताकद आहे? या दोन्हींचा आढावा घेण्यात आला. ज्या वॉर्डमध्ये भाजप कमकुवत आहे? त्या ठिकाणी सदस्य नोंदणीद्वारे भाजपच्या संघटन वाढीचे आदेश देण्यात आले आहे. महाविकास आघाडीची वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे? याचीही माहिती कोअर कमिटी बैठकीत घेतली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.