नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Kanthepi Road Double-Decker Viaduct: नागपूर मेट्रोच्या कंठपी रोड डबल डेकर व्हायाडक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मान. जगातील सर्वात लांब डबल डेकर (मेट्रो वर्गातील) म्हणून मान्यता.
Nagpur Metro
Nagpur MetroSaam
Published On
Summary
  • नागपूर मेट्रोच्या कंठपी रोड डबल डेकर व्हायाडक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मान.

  • जगातील सर्वात लांब डबल डेकर (मेट्रो वर्गातील) म्हणून मान्यता.

  • ५६२६.४४ मीटर लांबीचे, पाच मेट्रो स्थानकांसह.

  • ट्रॅफिक कोंडी कमी करण्यास व नागपूरच्या विकासाला मोठा हातभार.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (नागपूर मेट्रो) नावावर आणखी एक विक्रम नोंदला गेला आहे. कंठपी रोडवरील डबल डेकर व्हायाडक्टला जगातील सर्वात लांब डबल डेकर (मेट्रो वर्गातील) म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिली आहे. हे प्रमाणपत्र महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्दिकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्निल डांगरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राकेश सिंह व सी. एम. सिन्हा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे डबल डेकर व्हायाडक्ट एकाच खांबावर उभे असलेले अद्वितीय वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. या संरचनेचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले होते. एकूण ५६२६.४४ मीटर लांबीचे हे व्हायाडक्ट गड्डीगोडमजवळील गुरुद्वाऱ्याजवळील अद्वितीय चार-स्तरीय वाहतूक प्रणाली समाविष्ट करते. या संरचनेत सर्वात वर मेट्रो व्हायाडक्ट, त्याखाली हायवे फ्लायओव्हर, रेल्वेमार्ग आणि तळाशी कंठपी रोड असा क्रम आहे.

Nagpur Metro
भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

यापूर्वीही वर्धा रोडवरील ३.१४ किमी डबल डेकर व्हायाडक्ट गिनीज बुकमध्ये नोंदला गेला होता. त्यामुळे नागपूर मेट्रोने पुन्हा एकदा आपली छाप जागतिक पातळीवर उमटवली आहे.

Nagpur Metro
आधी मंदिरात लग्न नंतर जंगलात बलात्कार; ६० वर्षीय वृद्धाचं १५ वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य

कंठपी रोड डबल डेकर व्हायाडक्टची वैशिष्ट्ये:

गड्डीगोडम परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये बांधकाम पूर्ण.

या व्हायाडक्टवर पाच मेट्रो स्थानके – गड्डीगोडम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नरी रोड व ऑटोमोटिव्ह चौक.

गुरुद्वाऱ्याजवळ रेल्वेमार्गावर ८० मीटर लांबीचा स्टील ब्रिज.

एकाच पाया (कॉमन सबस्ट्रक्चर) वर स्वतंत्र सुपर-स्ट्रक्चर्सद्वारे मेट्रो व हायवे फ्लायओव्हरची रचना.

हायवे फ्लायओव्हरसाठी स्पाइन अँड रिब प्रकारचे स्ट्रक्चर तर मेट्रोसाठी प्री-स्ट्रेस्ड बॉक्स गर्डर पद्धत वापरली.

गड्डीगोडम गुरुद्वाऱ्याजवळ १६५० टन वजनाचा स्ट्रक्चर उभारण्यात आला, जो देशात पहिलाच आहे.

वर्धा रोड व कंठपी रोडवरील दोन्ही डबल डेकर मिळून एकूण ९ किमी लांबीचे.

डबल डेकर व्हायाडक्टचे फायदे:

अतिरिक्त जमीन संपादन टाळले (जमीनखरेदी, पुनर्वसन व भरपाईचा खर्च वाचला).

शहरी परिसरावर होणारा ताण व भूभागावरील परिणाम कमी झाला.

बांधकामाचा वेळ व खर्च दोन्ही कमी झाले.

कंठपी रोडवरील वाहनांच्या कोंडीत मोठ्या प्रमाणात घट झाली.

महा मेट्रोने या व्हायाडक्टसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला अर्ज केला होता. भारतीय प्रतिनिधींनी तांत्रिक पाहणी करून मान्यता दिल्यानंतर नागपूर मेट्रोला हा जागतिक सन्मान प्राप्त झाला. या उपलब्धी नागपूर मेट्रोने केलेल्या यशस्वी व जागतिक दर्जाच्या कामगिरीचे प्रतीक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com