आधी मंदिरात लग्न नंतर जंगलात बलात्कार; ६० वर्षीय वृद्धाचं १५ वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य

Latest Crime News: एका ६० वर्षीय वृद्धाने १५ वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने लग्न केलं. नंतर जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला.
Uttar pradesh kushinagar Crime news
Uttar pradesh kushinagar Crime newsSaam Tv News
Published On
Summary
  • एका ६० वर्षीय वृद्धाने १५ वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने लग्न केलं.

  • नंतर जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला.

  • तसेच घरी गेल्यानंतरही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने १५ वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने लग्न केलं. नंतर जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच घरी गेल्यानंतरही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना मंगळवारी नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन हद्दीतील गावात घडली आहे. ६० वर्षीय वृद्धाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले होते. मंदिरातून परतत असताना जंगलात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यानं त्याच्या घरीही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

Uttar pradesh kushinagar Crime news
भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

पीडितेनं थेट पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक सिंह म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

Uttar pradesh kushinagar Crime news
सणासुदीला सोन्याच्या भावात मोठी घट! १० तोळं सोनं ११०० रूपयांनी स्वस्त, वाचा लेटेस्ट दर

पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पीडितेचा जबाब नोंदवला जाईल. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे समाजातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Uttar pradesh kushinagar Crime news
मराठा आंदोलनात घुसखोरी, मध्य प्रदेशच्या तरूणाला मराठ्यांनी पकडले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com