महाराष्ट्रात मोठा उलटफेर होणार? भाजप नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? पडद्यामागं काय आहे चर्चा?

maharashtra government Extension : राज्यात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ पडण्याची चर्चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात मोठा उलटफेर होणार? भाजप नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? पडद्यामागं काय आहे चर्चा?
Published On
Summary

महाष्ट्रात उलटफेर होण्याची शक्यता

भाजपच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद पडण्याची जोरदार चर्चा

प्रवीण दरेकरांना सहकार मंत्रिपद देण्याचं भाष्य, नंतर सारवासारव

सचिन जाधव, साम टीव्ही

महाराष्ट्रात लवकरच मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. अर्थ खात्यापाठोपाठ आता सहकार खात्यावरही भाजपचा डोळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचालक मंडळ कार्यालय उद्घाटन आणि सहकारी पदाधिकारी परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकात पाटील आणि अध्यक्ष प्रवीण दरेकर उपस्थितीत होते. पुण्यातील या कार्यक्रमातील मंत्री चंद्रकात पाटील यांच्या भाषणावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात मोठा उलटफेर होणार? भाजप नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? पडद्यामागं काय आहे चर्चा?
मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याला संधी?

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाषणामुळे अर्थ खात्यापाठोपाठ सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 'प्रवीण दरेकरांच्या नावासमोरच कॅबिनेटचा दर्जा लावून ते पुढचे सहकारी मंत्री व्हावेत, असं भाष्य करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांना सुचक शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु भाषणानंतर माध्यमांशी बोलताना सारवासारव केली. भाषणात असं बोलावं लागतं, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी नंतर केला.

मंत्री चंद्रकात पाटील यांनी सहकारवर क्षेत्रावर भाष्य करताना म्हटलं की, 'ही १०७ वर्ष जुनी संस्था आहे काळाच्या ओघात मोडकळीस आली. स्वयम् अर्थसाह्य संस्थेचे अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रासाठी काम करायचे ठरवले आहे. नूतनीकरण माझ्या हस्ते केले. मी अनेक काम केले आहे आहेत. ही संस्था चालवण्यासाठी लागणारे शुल्क आणेन'.

महाराष्ट्रात मोठा उलटफेर होणार? भाजप नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? पडद्यामागं काय आहे चर्चा?
ठाकरेंचे खासदार शिंदे सेनेच्या पहिल्या रांगेत दिसतील; मंत्र्यांच्या विधानाने चर्चांना उधाण

'सहकार विद्यापीठ मागणी केली आहे. अमित शहा यांच्याकडे आपण काय सांगू शकतो का? एक सहकारनामा कॉलेजसाठी प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा अर्थ काढणं म्हणजे पत्रकार.. भाषणात बोलायच्या सदिच्छा आहेत. आता मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खातं आहे. सहकारात काम चांगला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सगळं काही कळतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com