ठाकरेंचे खासदार शिंदे सेनेच्या पहिल्या रांगेत दिसतील; मंत्र्यांच्या विधानाने चर्चांना उधाण

bharat gogawale News : उद्धव ठाकरे यांचे खासदार शिंदे सेनेच्या पहिल्या रांगेत दिसतील, असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. मंत्र्यांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.
bharat gogawale news
bharat gogawale Saam tv
Published On
Summary

राज्यात राजकीय घडामोडींना वेग

खासदार फुटणार असल्याचा दावा ठाकरे गटाने फेटाळला

ठाकरेंनी दावा फेटाळल्यानंतरही मंत्री गोगावले यांनी मोठं विधान केलंय

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. ठाकरेंचे 8 खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु ठाकरे गटाने दावा फेटाळून लावला. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार शिंदेसेनेत प्रवेश करतील, असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्री भरत गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी ऑपरेशन टायगरवर मोठं भाष्य केलं. मंत्री भरत गोगावले म्हणाले, ठाकरे गटाचे जे न बोलणारे खासदार आहेत. तेच पहिल्या रांगेत दिसतील. कोणी काही म्हणत असाल, तर ज्या चर्चा चालू आहेत. त्या सकारात्मक सुरू आहेत'.

bharat gogawale news
Maharashtra politics : शिंदेंचं महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर, आमदार-खासदार गळाला लागणार? ठाकरेंच्या शिवसेनेत धाकधूक

धाराशिवात खासदार ओमराजे निबांळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर येणे टाळले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले ओमराजेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मला लातूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगितले. यावर भाष्य करताना मंत्री गोगावले म्हणाले, 'ओमराजे संपर्कात का आले नाही हे सांगू शकत नाही. मात्र चर्चा चालू आहेत, त्या पॉझिटिव्ह आहेत'.

कॉमेडियन कुणाल कामरावर देखील गोगावले यांनी भाष्य केलं. 'कुणाल कामरा सारख्या लोकांना आम्ही किंमत देत नाही, असे म्हणत गोगावले यांनी कामराच्या माफी न मागण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष केले.

bharat gogawale news
Maharashtra Politics: राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार; शिवसेना खासदारचा दावा

फोडाफोडीवर बोलताना मंत्री गोगावले म्हणाले, 'काही गोष्टी उघड करायच्या नसतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा वापरत आहे. समोरचा काय बोलतो काही नाही यात समजून जायचं काय होणार आहे. थोड्या दिवसात प्रचिती येईल जे न बोलणारे आहेत तेच पाहिल्या रांगेत दिसतील'. 'भाजपकडून दडपशाही होत नाही. असे काही कुठे चालणार नाही. आमचा 60:40 असं प्रमाण ठरलं आहे. त्या पद्धतीने ज्या त्या जिल्ह्यात निधी दिला जाईल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com