मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याला संधी?

Modi Cabinet Reshuffle: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ मंत्रीपदे मिळण्याची चर्चा असून पक्षातील काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
एकनाथ शिंदे
Eknath ShindeSaam Tv
Published On

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या फेबरदलात २ मंत्रि‍पदे मिळू शकतात, असा अंदाज खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यामध्ये मंत्रिमंडळातील जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रि‍पदासाठी लॉबिंग सुरू करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेंकडून कुणाला संधी दिली जाणार? याची शिवसेनेत चर्चा सुरू झाली. शिंदेंच्या शिवसेनेचे वर्तमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याऐवजी मावळ(जि.पुणे) मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांची ही तिसरी टर्म आहे. प्रताप जाधव यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी बारणे यांचा नंबर लागू शकतो. प्रतापराव जाधव यांच्या कामावर शिंदे नाराज असल्याची चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांपेक्षा मित्रपक्ष भाजपाची कामे करण्याकडे जाधव यांचा कल असल्याची कुरबुर शिंदेंच्या शिवसेनेत ऐकायला मिळते. अ.भा.आयुर्वेद महासम्मेलन ट्रस्टवर भाजपातील अगदीच ज्युनियर असलेल्या एका वैद्याची पदाधिकारी म्हणून वर्णी लावण्यासाठी जाधवांनी पुढाकार घेतला ही बाब काही जणांना खटकली आहे. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीतील या कार्यक्रमाला खरंतर शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या अन्य खासदारांची उपस्थिती औचित्याची ठरली असती व मंत्री जाधवांनीही त्याबाबत आग्रही असायला हवे होते. पण जाधव यांनी या राष्ट्रीय स्तरावरच्या आरोग्य मेळाव्यात शेगावसारख्या छोट्याशा गावात स्वत:वरच फोकस करण्यात धन्यता मानली.

एकनाथ शिंदे
Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांना आणखी एक धक्का, महिला प्रदेशाध्यक्षपद जाणार, मोठी अपडेट आली समोर

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या खांद्यावरील मंत्रीपदाचा भार उतरवण्यासाठी त्यांच्याच शिवसेना पक्षातून हालचाली वाढल्या आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे तर शिवसेना पक्षाच्या केंद्रीय मंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडण्यासाठी आतूर झालेले दिसत आहेत. जाधव यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला अन्य खासदारांनाही मंत्रीपदाची संधी देणे हा पक्षातील व्यवस्थेचा भाग असू शकतो, असे पक्षातून सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे
Rupali Chakankar video : संतापजनक! चाकणकरांचा पराक्रम; भोंदू बाबा खरातची विठ्ठलाशी तुलना, अध्यक्षपद केलं अर्पण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com