ZP निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष; अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर, सामचा एक्झिट पोलचा अंदाज

maharashtra zp election exit poll : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या एग्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसत आहे.
zp election exit poll
maharashtra zp election exit poll Saam tv
Published On
Summary

१२ जिल्हा परिषद निवडणुकांचा एक्झिट पोल समोर

निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

शिंदेसेना दुसऱ्या, अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या निकालात महायुतीतील पक्षाचा डंका पाहायला मिळाला. महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी बाजी मारली होती. महापालिका निवडणुकीनंतर आता झालेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप बाजी मारताना दिसत आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमाकांवर असणार आहे.

१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडलं. या जिल्हा परिषदेसाठी काही ठिकाणांचा अपवाद वगळता शांततेत पार पडलं. १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सांयकाळी ६ वाजेपर्यंत मतदानांची गर्दी पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या मतदानानंतर आता साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहे. या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप २६३ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर शिंदेसेना १५६ जागा जिंकण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ११८ जागा मारण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

zp election exit poll
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत विरोधकांची दाणादाण उडाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला ५०च्या पार जागा जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. ठाकरेसेनेला ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला ६१ जागांवर समाधान मानावे लागणार आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत इतर पक्षांना ३७ जागा मिळण्याची शक्यता आहे.

zp election exit poll
मुंबईत मोठा राडा; 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी बिल्डरचं ऑफिस फोडलं, खुर्च्यांची फेकाफेक, VIDEO

अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर

तत्पूर्वी, १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार थांबवला होता. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा उत्साह दिसला नव्हता. अजितदादांच्या निधनानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी काही ठिकाणच्या सभा रद्द केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com