

मुंबईच्या चेंबूरमध्ये बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आलीये
बिल्डरला अटक न झाल्याने वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पवित्रा
'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी ऑफिसच्या काचा फोडल्या
मुंबईच्या चेंबूरमध्ये मोठा राडा झाला आहे. चेंबूरमधील बिल्डर सुशील रहेजा यांचं ऑफिस वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. काही दिवसांपूर्वी रहेजा बिल्डरने कार्यालयात कर्मचाऱ्याला अपमानजनक आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती. बिल्डरविरोधात गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतरही अटक न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्यांच्या कार्यालयात असलेल्या राहुल जाधव या तरुणाच्या तरुणाला क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली होती. या तरुणाला सर्व स्टाफसमोर मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलन केलं होतं. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतरही पोलिसांकडून बिल्डरला अटक करण्यात आली नव्हती. यामुळे आक्रमक झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रहेजा यांचं ऑफिस फोडलं. ऑफिसमधील काचा फोडल्या. खुर्च्यांची फेकाफेक केली.
सुशील रहेजा यांचं चेंबूरमध्ये ऑफिस आहे. त्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसवर पोहोचले. त्यानंतर रहेजा घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर आक्रमक झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर रहेजा यांचं ऑफिस फोडलं. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजा यांच्या कार्यालयात नोकरीस आहे. कार्यालयात घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला स्टाफसमोर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर 'तुम घाटी लोग कभी सुधरेगा नही' असे वादग्रस्त आणि जातीवाचक शब्द वापरून अपमान केला होता. सर्व स्टाफसमोरच राहुलला मारहाण केल्याचा आरोप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.