भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

BJP CM Offer to Eknath Shinde : भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र या ऑफरसाठी शिंदेंसमोर अट ठेवण्यात आली आहे.
BJP CM Offer to Eknath Shinde :
Maharashtra Politics Abuzz After Claim of BJP's CM Offer to Eknath ShindeSaam tv
Published On
Summary
  • एकनाथ शिंदेंना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा

  • या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राजकारणातले चाणक्य, विकासपुरुष , पोलादी पुरुष असल्याचं गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्याआधी अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं होतं. आता हाती आलेल्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

BJP CM Offer to Eknath Shinde :
Amit Shah बाजूला Eknath Shinde यांना कॉल अन् शिंदे स्टेजवरून उतरले, 'तो' फोन कुणाचा?

अ‍ॅडव्होकेट असिम सरोदे यांनी याबाबत सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट केली आहे. सरोदे यांच्या पोस्टमुळे राज्यातील राजकारणासह देशभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. एका बड्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र त्यासाठी विलीनकरणाची मोठी अट ठेवली आहे, असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पहिल्यांदा बंड करत अनेक खासदार आणि आमदारांना फोडलं होतं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

BJP CM Offer to Eknath Shinde :
Maharashtra Politics: ठाकरे गटातील फुटीमागे ना भाजप ना शिवसेना; 'ऑपरेशन टायगर' का घडलं? मोठं कारण आलं समोर

आता दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या गटाला खिंडार पाडलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटातील ५ खासदारांना फोडलंय. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतेय. या खासदारांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर केंद्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढणार आहे. दरम्यान शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरमुळे भाजप त्यांच्यावर खूश असल्याचं दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनीही त्यांचे कौतुक केलंय.

त्याचदरम्यान वकील असिम सरोदे यांच्या एका एक्सवरील पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरोदे यांच्या पोस्टनुसार भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. त्यासाठी भाजपनं एक अट ठेवली आहे, तेी अट म्हणजे शिवसेनेला भाजपमध्ये विलीन करण्यास सांगितलंय.

काय आहे पोस्ट

भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळतेय. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com