Amit Shah बाजूला Eknath Shinde यांना कॉल अन् शिंदे स्टेजवरून उतरले, 'तो' फोन कुणाचा?

Eknath Shinde Phone Call: कोल्हापूरमध्ये अमित शहा यांची सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन आला. हा फोन घेण्यासाठी शिंदे स्टेजच्या बाजुला गेले, त्यामुळे हा फोन कॉल चर्चेचा विषय ठरला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मात्र यावेळी अशी एक घटना घडलीय, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. अमित शहांची कोल्हापूर या ठिकाणी सभा सुरू होती. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन आला. त्यानंतर ते फोन रिसीव्ह करण्यासाठी खुर्चीवरून उठून स्टेजच्या बाजूला जाऊन फोनवर बोलू लागले. या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे आता राजकीय विश्वामध्ये मोठी चर्चा सुरू आहे, हा फोन नेमकी कुणाचा होता, असा प्रश्न विचारला जातोय.

एरव्ही इतक्या मोठ्या कार्यक्रमात मंत्री स्टेजवरून उठून जात नाही, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोन घेण्यासाठी स्टेजच्या बाजुला गेल्यानं हा फोन नेमका कोणाचा होता. असा प्रश्न विचारला जातोय. इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच अमित शहा यांच्या सभेतून थेट बाजूला जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरती बोलत आहेत. यामुळे आता राजकीय विश्वामध्ये मोठी चर्चा सुरू आहे .

सभेच्या दरम्यान अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेजण बसलेले होते. तिथे एक फोनची रिंग वाजली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याशी थोडसं बोलून तात्काळ उठून गेले. त्यानंतर ते फोन रिसीव्ह करतात दरम्यान ही घटना घडत असताना महाराष्ट्रात दुसरीकडे एक घटना घडली, ती म्हणजे पवनराजे हत्याकांडाचा जो निकाल. हा निकाल हा ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com