Sharad Pawar: भाजपकडून शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याच्या मुलासह १५०० कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Sharad Pawar Setback 1500 Workers Join BJP: हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे कमळ हाती घेतलं.
Sharad Pawar: भाजपकडून शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याच्या मुलासह १५०० कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Sharad Pawar NCP Maharashtra Political NewsSaam Tv
Published On

Summary -

  • शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का

  • आतिश दांडेगावकर यांनी १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला

  • नवी मुंबईमध्ये ४५० ते ५०० गाड्यांचा ताफ्यासह केलं शक्तीप्रदर्शन

  • या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढली

राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावर यांच्या मुलाने भाजपची साथ सोडली. आतिश दांडेगावकर यांनी १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. नवी मुंबईमध्ये त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी नवी मुंबईत हिंगोलीवरून ४५० ते ५०० गाड्यांचा ताफा आला होता. या पक्ष प्रवेशामुळे हिंगोलीमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हिंगोलीचे नेते आणि माजी मंत्री जय प्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आतिश दांडेगावकर यांच्यासह १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

Sharad Pawar: भाजपकडून शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याच्या मुलासह १५०० कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद आणखी वाढली, मनसे अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

४५० ते ५०० गाड्यांचा ताफा नवी मुंबई शहरामध्ये आतिश दांडेगावकरांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवत भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. 'हिंगोली जिल्ह्यांमध्ये विकासाची गरज आहे या दृष्टीने भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भाजपात पक्ष प्रवेश करण्याची इच्छा होती.', असे आतिश दांडेगावकर यांनी सांगितले.

Sharad Pawar: भाजपकडून शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याच्या मुलासह १५०० कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: विरारमध्ये भाजपला खिंडार, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह बविआमध्ये पक्षप्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com