Gold Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर किती?

Gold And Silver Prices: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. चांदी ४००० रुपयांनी स्वस्त झाली. तर सोनं १००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीचे दर किती ते वाचा...
Gold Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर किती?
Gold and silver prices Saam Tv
Published On

Summary:

  • आज जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदी दरात मोठी घसरण

  • आजचा २४ कॅरेट २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोनं झालं स्वस्त

  • चांदीच्या दरात देखील मोठी घसरण

  • १ किलो चांदी ४००० रुपयांनी स्वस्त

संजय महाजन, जळगाव

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोनं-चांदीच्या दरावर देखील होताना दिसत आहे. दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी देखील युद्ध थांबेना. या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून दर वाढले, तर दुसरीकडे युद्धादरम्यान सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या....

सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर १००० रुपयांची तर चांदीचे दर ४००० रुपयांनी स्वस्त झाले. आज सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ६१ हजार १९५ रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ६३ हजार ६८० रुपयांवर गेले आहे. सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे सराफा बाजारात सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

Gold Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर किती?
Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

तर, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४९० रुपयांनी घसरण झाली असून हे सोनं १,५९,१७० रुपयांना विकले जात आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४५० रुपयांनी घसरण झाली असून हे सोनं १,४५,९०० रुपयांना विकले जात आहे. तर १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३६० रुपयांनी घसरण झाली असून हे सोनं १,१९,३८० रुपयांना विकले जात आहे. तर आज १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांनी घसरण झाली असून त्याची किंमत २,७०,००० रुपये इतकी आहे.

Gold Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर किती?
Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com