Ashok Kharat: भोंदूबाबा खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

Ashok Kharat case deputy collector transfer: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली.
Ashok Kharat: भोंदूबाबा खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Ashok Kharat case saamtv
Published On

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात पहिली सरकारी कारवाई

  • उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची बदली

  • जमीन गुंतवणूक प्रकरणामुळे कारवाई

  • या कारवाईनंतर इतर अधिकारीही तपासाच्या रडारवर

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामुळे आता शासकीय अधिकारी अडचणीत आला आहे. मुंबईतील उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अभिजीत भांडे पाटील असं या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. अभिजीत भांडे यांची बदली थेट मंत्रालयामध्ये करण्यात आले आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये आता राजकीय नेत्यांनंतर शासकीय अधिकारी देखील अडचणीत आले आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत आला आहे. या प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. अभिजित भांडे पाटील यांची मंत्रालयातील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. अभिजीत भांडे यांना अशोक खरातसोबत पत्नीच्या नावे गुंतवणूक करणं भोवलं. खरात प्रकरणात आता अनेक महसूल अधिकारी देखील रडारवर आहेत.

Ashok Kharat: भोंदूबाबा खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

मुंबईमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजीत भांडे पाटील यांचे भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबत संबंध असल्याचे उघड झाले. अभिजीत भांडे यांनी अशोक खरातच्या मुलगी आणि बायकोच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: भोंदूबाबा खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Kharat Case : त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही...भोंदू अशोक खरातवरून विधानसभेत खडाजंगी, कोण काय म्हणालं? VIDEO

अशोक खरात प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात आधी राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांची नावं समोर येत असल्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.

Ashok Kharat: भोंदूबाबा खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Ashok Kharat Case: सुनिल तटकरे, चाकणकरांची 'अनामिका' वादात; 'गाडीच्या दारात बोट चेपल्याने जखम'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com