मराठी भाषेच्या कार्यक्रमात भोजपुरी धिंगाणा, मराठी सक्ती करणाऱ्यांनाच अस्मितेचा विसर

Bhojpuri Dance Marathi Certificate Event Shinde Sena Row Mumbai: भैय्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी भाषा प्रमाणपत्र कार्यक्रमावरून राजकीय वाद पेटलाय. हा वाद निर्माण झालाय शिंदेसेनेच्या नेत्याच्या कार्यक्रमात... कशामुळे नेमका वाद पेटलाय?... या कार्यक्रमावर कुणी आक्षेप घेतलाय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Bhojpuri dance at Marathi language certificate programme in Mumbai
Bhojpuri dance at Marathi language certificate programme in Mumbaisaam tv
Published On

पाहिलंत... मराठी संस्कृतीची ऐशीतैशी करणारा हा प्रकार घडलाय... मुंबईच्या बोरीवलीत कोराकेंद्र मैदानावर आयोजित शिंदेसेनेच्या कार्यक्रमात.. राज्यातील सर्व रिक्षा-टॅक्सी चालक भैय्यांना सरकारनं मराठी सक्तीची केलीये. याच पार्श्वभूमीवर राज्यातील भैय्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकल्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केला होता..आणि कार्यक्रमात चक्क भोजपुरी गाण्यांचा धिंगाणा घातला. विशेष म्हणजे, यावेळी भैय्या रिक्षा-टॅक्सी चालकांनी शिंदेसेनेचे उपरणे गळ्यात घालून भोजपुरी गाण्यांच्या तालावर नाचले. त्यामुळे आता विरोधकांनी शिंदेसेनेवर निशाणा साधलाय.

तर दुसरीकडे भोजपुरी गाण्यावरून प्रताप सरनाईकांनी प्रकाश सुर्वेंचे कान टोचलेत. थेट स्टेजवरून सरनाईकांनी सुर्वेंना सूचना केलीये. इतकंच नव्हे तर, मालाडमध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मराठी न बोलता येणाऱ्या चालकांना मराठी प्रमाणपत्र वाटण्यात आल्याचं समोर आलंय.

मराठी सक्ती करणारे सरकारमधील मराठी नेतेच भोजपुरी गाण्यावर धिंगाणा घालत प्रमाणपत्रांची उधळण करताहेत. त्यामुळे शिंदेसेनेनं खरंच मराठी सक्तीचा निर्धार केलाय की केवळ हा दिखावा आहे असा प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com