Sachin Savant criticized BJP : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भाजपतर्फे २२७ वॉर्डांमध्ये विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. यानिमित्त ३० ठिकाणी 'भीमयात्रा' काढण्यात येणार आहेत.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे. यावर आता काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. भीमयात्रा हे भाजपचं मतांसाठीचं ढोंग असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (Latest Political News)
मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी सायंकाली ट्वीट करून भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये माहिती देताना शेलार यांनी सांगितले की, 'भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भाजपतर्फे २२७ वॉर्डांमध्ये विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
यानिमित्त ३० ठिकाणी 'भीमयात्रा' काढण्यात येणार आहेत. तसेच भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट दाखवणाऱ्या भव्य लेजर शो चेही आयोजन वरळीत करण्यात आले आहे". तसेच मुंबईकरांनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे असे निमंत्रणही त्यांनी दिले आहे. (Latest Marathi News)
शेलारांच्या या ट्वीटला रिप्लाय देत सचिन सावंत यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. "'भीमयात्रा' ते ही भाजपा? मतांसाठी काहीही? बाबासाहेबांनी त्यांचा पक्ष संघाशी कोणताही संबंध कदापि ठेवणार नाही हे निक्षून सांगितले होते. त्यातही त्यांचे संघविचारधारेबद्दल काय मत होते ते त्यांनी स्पष्टपणे दिसून ठेवले आहे. त्यामुळे भाजपाचा मतांसाठीचे ढोंग जनता ओळखते, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.