Maharashtra Governor News : भगतसिंह कोश्यारींनंतर आता नवे राज्यपाल रमेश बैसही लवकरच पदमुक्त होणार? काय आहे कारण...

Ramesh Bais : आगामी विधानसभेसाठी मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ दिली जाऊ शकते.
Ramesh Bais
Ramesh Bais Saam TV
Published On

Governor Raemsh Bais News: भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानतंर राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची वर्णी लागली. रमेश बैस यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यपालपदाची शपथ घेतली. मात्र दोन महिनेही उलटत नाही की रमेश बैस है देखील पदमुक्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.

येत्या वर्षाअखेर छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये रमेश बैस हे भाजपचा चेहरा होऊ शकतात. छत्तीसगडमध्ये भाजपमध्ये खंबीर नेतृत्त्वाचा अभाव आहे. रमेश बैस यांच्या आगामी विधानसभेसाठी मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ दिली जाऊ शकते. (Latest News Update)

Ramesh Bais
Sanjay Raut PC: MVA लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकणार, नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार? संजय राऊत सविस्तर बोलले

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस यांनी नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते. (Political News)

१९८९ साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले. २००३ साली रमेश बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

Ramesh Bais
Navi Mumbai MNS News: राज ठाकरेंना मोठा धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

२००९ ते २०१४ या काळात श्री रमेश बैस भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१९ ते २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून वर्णी लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com