Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi: 'माफी मागा, मग महाराष्ट्रात पाय ठेवा', चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

Chandrashekhar Bawankule News : राहुल गांधी यांनी आधी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी: चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi
Chandrashekhar Bawankule on Rahul GandhiSaam Tv
Published On

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi: स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यच वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार असल्याची शक्यता आज ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

यावरूनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. ''उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा,'' असं ते म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi
BMC News: 'बीएमसी'तील भांडीचोर कोण? वर्षभरात 7 हजार चमचे चोरीला, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

काय म्हणाले बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, ''स्वा. सावरकरांचा राहुल गांधी यांनी पाच वेळा अपमान केला. त्यांनी ही भूमिका अद्यापही बदलली नसून त्यांनी माफीही मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही.'' (Latest News Update)

उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी, अशी माझी मागणी असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi
Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray: राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली शक्यता

'महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी माफी मागावी'

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, सावरकरांची ज्याप्रकारे अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. एकदाच नाही तर पाच वेळा जाणीवपूर्वक स्वा. सावरकर यांचं नाव घेऊन टीका केली. सावरकर यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका, असं त्यांना अनेकांनी वारंवार समजावलं. तुमची ती उंची नाही आहे. तरीही त्यांनी अपमान केला. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com