Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray
Rahul Gandhi Meet Uddhav ThackeraySaam TV

Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray: राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली शक्यता

Sanjay Raut on Rahul Gandhi : राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली शक्यता

Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray: गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर राहुल गांधी मुंबईत मात्रोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

यातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही शक्यात व्यक्त केली आहे.

Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray
Sharad Pawar Meets Rahul Gandhi: विरोधकांचं ठरलं! वज्रमुठ घट्ट; शरद पवार यांच्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले...

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले आहेत की, काल शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली. हे चांगले संकेत आहे. याआधी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. मी आजच वाचलं की, राहुल गांधी हे ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. (Latest News Update)

भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्ष नेते एक सोबत भेटू नये आणि एकत्र येऊ नये, हा भारतीय जनता पक्षचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. त्यांचा हा भ्रम तुटणार आहे. 2024 मध्ये संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येणार.

Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray
Wardha Crime News : वर्ध्यात बँकेचे गेलेल्या शेतकऱ्याचे चोरट्यांनी केले दीड लाख लंपास, घटना सिसिटीव्हीत कैद

'राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकते'

ते म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांच्यावतीने काँग्रेसने वरिष्ठ नेते के सी वेणुगोपाल मुंबईत येत आहे. ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि चर्चा करतील. त्यांच्यानंतर मल्लीकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांच्याशीही भेट होऊ शकते.

संजय राऊत म्हणाले की, जेव्हा मी दिल्लीत राहुल गांधी यांना भेटलो. तेव्हा सोनिया गांधी या देखील तिथे उपस्थित होत्या. तेव्हा आम्हीही चर्चा केली. त्यावेळी आम्ही त्यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिल. राहुल गांधी लोकप्रिय नेता असून त्यांचा संघर्ष ताणाशीही विरोधात आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. यातच आमचं ही कर्तव्य आहे की, जे आमचे मतभेत आहेत, त्यांना दूर ठेवून देशात जे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. त्यात कोणतीही अडचण येऊ देऊ नये. म्हणूनच सर्वच विरोधी पक्षांची चर्चा जी राहुल गांधी आणि खरगे यांच्याशी सुरु आहे. ती खूप आशादायी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com