Wardha Crime News : वर्ध्यात बँकेचे गेलेल्या शेतकऱ्याचे चोरट्यांनी केले दीड लाख लंपास, घटना सिसिटीव्हीत कैद

Crime News : वर्ध्यात बँकेचे गेलेल्या शेतकऱ्याचे चोरट्यांनी केले दीड लाख लंपास
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam Tv
Published On

Wardha Crime News : मक्त्याने केलेल्या शेतीचा मक्ता चुकविण्यासाठी पुतण्यासह बँकेत गेलेल्या शेतकऱ्याचे तब्बल दीड लाख रुपये चोरट्या महिलेने चोरुन नेले. ही घटना वर्धेच्या भामटीपूरा चौकात असलेल्या युनियन बँकेत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ही चोरीची घटना बँकेच्या सिसिटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप नानाजी हायगुने (48) रा. गोजी हे मक्त्याने शेती करतात. शेतमालकाला 2 लाख रुपये मक्ता द्यायचा होता. त्यांना बचत गटाने अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश वटविण्यासाठी ते पुतण्यासोबत युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेत अनेकजण उपस्थित होते. धनादेश वटविला असता 500 रुपयांच्या नोटांचे पाच बंडल बँकेतून मिळाले. ते सर्व पैसे दिलीप हायगुने यांनी पुतण्याच्या बॅगमध्ये ठेवले होते.

Wardha Crime News
Saamana Editorial On Modi Government : प्रिय बाबासाहेब, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय? सामनातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

पुतण्याने ती बॅग खांद्यावर लटकवून ते दोघेही बँकेबाहेर निघाले. खाली उतरल्यावर त्यांना बॅगची चेन अर्धवट उघडी दिसली. त्यांनी बॅगमधील पैशांची पाहणी केली असता त्यात 500 रुपयांचे तीन बंडल म्हणजेच दीड लाख रुपये दिसून आले नाही. अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये बॅगची चेन उघडून नेल्याचे समजताच हायगुने याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.  (Latest News Update)

बँक परिसरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटी महिला कैद झाली. दिलीप हायगुने यांचा पुतण्या बँकेतील लोखंडी फाटकातून बाहेर निघत असताना त्याच्या मागून आलेल्या चोरट्या महिलेने चेन उघडून पैशांचे तीन बंडल काढून घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चोरटी महिला चेहरा झाकून असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.

Wardha Crime News
Amravati News : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं नामांतर, राणा दाम्पत्याने रात्री 12 वाजता लावले फलक

अशोक सुर्यभान पाटील रा. भिमनगर मास्टर कॉलनी वर्धा यांच्या मालकीची गोजी येथील 14 एकर शेती दोन लाख रुपये मक्त्याने दिलीप हायगुने यांनी केली होती. मक्ता देण्यासाठी शेतमालक देखील त्यांच्यासोबत बँकेत गेला होता. बँकखाली शेतमालक प्रतिक्षेत होता. हायगुने यांचे पैसे चोरी गेल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com