Amravati News : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं नामांतर, राणा दाम्पत्याने रात्री 12 वाजता लावले फलक

Amravati News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राणा दाम्पत्याने हार घालत अभिवादन केलं.
Amravati News
Amravati News Saam TV
Published On

अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचं नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त करण्यात आलं. पूर्वीचे रुग्णालयाचे 'इर्विन'या नावाऐवजी आता रुग्णालयाचे नाव 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' करण्यात आलं आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फलकाचे अनावरण केलं.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राणा दाम्पत्याने हार घालत अभिवादन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी आणि अमरावतीकर बाबासाहेब आंबेडकर चौकात उपस्थित होते. (Latest Marathi News)

Amravati News
Ambedkar Jayanti 2023:'जब तक सूरज चाँद रहेगा...'; बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद, तुमच्या मोबाईलवरून तारा कसा पाहणार?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रात्री 12 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 132 किलोचा केक कापण्यात आला. यावेळी रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील पोलीस उपायुक्त विक्रम साळी उपस्थित होते.

Amravati News
Ambedkar Jayanti WhatsApp Status : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त द्या शुभेच्छा

यानंतर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा रिपाइंचे राजेंद्र गवई यांच्यासह मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी फटाक्याची अतिशबाजी करत व जयंतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com