भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. भारतीय लोकशाहीला जागतिक स्तरावर एक नवा चेहरा देणारे आणि तळागाळाच्या समाजाचा आवाज होऊन त्यांना आधार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायमच अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले आहेत. शुक्रवारी 14 एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीच्या उत्साहात पार पडेल, त्यामुळे यंदा बाबासाहेबांच्या अनुयायांचा उत्साह वाढणार आहे. जगण्यातून, वागण्यातून बाबासाहेबांनी कायमच इतरांपुढे एक आदर्श ठेवला ज्याचं अनुकरण आजही अनेकजण करताना दिसतात. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश अभिवादन करा. जयंती निमित्त सोशल माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या जातीलच या खास शुभेच्छा संदेशचा नक्की उपयोग होईल...
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले
अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.