Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Bhigwan Crime: भिगवणमध्ये २१ वर्षीय तरुणीचे अपरहण करण्यात आले होते. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. तरुणी मध्यरात्री १ वाजता पोलिस ठाण्यात हजर झाली. यावेळी तिने मी स्वत:च्या इच्छेने तरुणासोबत गेल्याचे सांगितले.
Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Bhigwan Kidnapping CaseSaam Tv
Published On

Summary -

  • भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • तरुणी मध्यरात्री बारामती पोलिस ठाण्यात हजर झाली

  • अपहरण झाल्याचा आरोप फेटाळून लावत स्वतःच्या इच्छेने गेल्याचं पोलिसांना सांगितले

  • झहीर शेखसोबत लग्न करणार असल्याचे तिने प्रतिज्ञापत्र म्हटले

इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मध्यरात्री १ ते दीड वाजताच्या सुमारास तरुणी पोलिस ठाण्यात हजर झाली. बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होत तरुणीने मी झहीरसोबतच लग्न करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. तरुणी आणि झहीर या दोघांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले. 'आपले अपहरण झालेले नसून स्वतःच्या मर्जीनेच पळून गेल्याचा जबाब मुलीने नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे.

'माझ्या प्रेमसंबंधाची माहिती माझ्या घरच्यांना देखील होती. २२ तारखेला घरच्यांनी ठरवलेल्या लग्नाला माझा विरोध आहे. माझ्या आईने डोळ्यात मिरचीची पूड टाकून अपहरण केल्याची बनावट तक्रार दिली.', असे तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितल्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. तरुणीने त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Crime News: धक्कादायक! भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला आणि शिर नसलेला मृतदेह, परिसरात खळबळ

भिगवणमध्ये तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. तरुणी लग्नासाठी खरेदी करण्यासाठी आई आणि भावासोबत गेली होती. सोनं खरेदी करून घराकडे परत येत असताना या २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिचे अपरहण केले. झहीर हरुन शेख आणि त्याचा भाऊ आयान हरून शेख या दोघांनी तरुणीचे अपरहण केले होते. या प्रकरणी दोघांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Indapur Accident Video: धक्कादायक! कार शिकताना १० वर्षांच्या मुलाला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल

तरुणीच्या अपरहणाच्या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येत गुरूवारी आंदोलन करण्याचे ठरवले होते. भिगवण बंदची देखील हाक देण्यात आली होती. भिगवणमधील नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्गावर ठिया आंदोलन केले होते. पण तेवढ्यात अपरहण झालेल्या मुलीचा व्हिडीओ समोर आला होता. तरुण आणि तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यामध्ये 'मला जबरदस्ती नाही तर मी माझ्या इच्छेने निघून आले असल्याचे तिने सांगतिले. मी झहीर शेख यांच्यासोबत ९ वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे.', असे सांगितले.

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Pune Crime : भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! पीडित तरुणी आरोपींच्या संपर्कात, नेमकं काय प्रकरण? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com