Indapur Accident Video: धक्कादायक! कार शिकताना १० वर्षांच्या मुलाला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल

Indapur Car Accident CCTV: इंदापूरमध्ये कारने १० वर्षांच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. या अपघाताचा अंगाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Indapur Accident Video: धक्कादायक! कार शिकताना १० वर्षांच्या मुलाला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल
Indapur Accident CCTVSaam Tv

मंगेश कचरे, इंदापूर

भरधाव कारने सायकल चालवणाऱ्या १० वर्षांच्या मुलाला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदापूर (Indapur) तालुक्यातील भिगवणमध्ये (Bhigwan) ही धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचा (Indapur Car Accident) अंगाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ (Accident CCTV Video) समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना इंदापुर तालुक्यातील भिगवणमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. १० वर्षांचा समर्थ सुशिल शिंदे या मुलाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील मासळी बाजाराच्या आवारात एकजण चारचाकी वाहन चालवण्यास शिकत होता. यावेळी त्याच भागात राहणारा समर्थ शिंदे सायकल खेळत होता. यावेळी कार वळवत असताना समोरून समर्थ सायकल घेऊन आला. कार वळत असल्याचे पाहून समर्थने आपली सायकल लांबून नेण्याचा प्रयत्न केला. पण कारने सम्थला धडक दिली.

Indapur Accident Video: धक्कादायक! कार शिकताना १० वर्षांच्या मुलाला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल
Navi Mumbai Police Bharti: पाेलिस भरतीत पावसाचे विघ्न, जाणून घ्या नवी मुंबईचे नवे वेळापत्रक

अपघातामध्ये समर्थची सायकल दूरवर फेकली गेली आणि समर्थच्या अंगावरून कारचे पुढचे आणि मागचे चाक गेले. कारच्या चाकाखाली चिरडल्यामुळे समर्थ गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे समर्थला पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान बुधवारी सकाळी समर्थचा मृत्यू झाला.

Indapur Accident Video: धक्कादायक! कार शिकताना १० वर्षांच्या मुलाला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल
Baramati News : पवार घराणातले 3 खासदार दिल्लीचं राजकारण गाजवतील? बारामतीवरुन तिसऱ्या खासदाराची राज्यसभेत वर्णी..

समर्थच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबासोबतच संपूर्ण भिगवणकरांना मोठा धक्का बसला. शोकाकुल वातावरणात समर्थवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भिगवणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. भिगवणमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Indapur Accident Video: धक्कादायक! कार शिकताना १० वर्षांच्या मुलाला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल
Mumbai Pune Highway : लोणावळा शहरातून अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी; पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com