- रणजीत माजगावकर
आमच्या हक्काचे पैसे मिळणार नसतील तर आम्ही पण ऊसाच्या कांडीला कसा हात लावता बघू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने आमदार प्रकाश आवाडे यांना दिला. भाऊबीज निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महिला आघाडी आज आमदार प्रकाश आवाडे (mla prakash awade) यांना खर्डा भाकरी भेट देण्यासाठी तसेच मागण्यांची पुर्तता करा असे आवाहन करण्यासाठी गेली हाेती. त्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आमदार आवाडेंना इशारा दिला. (Maharashtra News)
आमदार प्रकाश आवाडे आंदाेलक महिलांना म्हणाले तुम्ही चुकीच्यावेळी आंदोलन करत आहात. आम्हांला तुमच्या मागणीप्रमाणे पैसे द्यायला जमणार नाही हे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. आता दंगा करायचा नाही. एकटयाने बाेला. त्यावेळी महिलांना ऊस दर मिळालाच पाहिजे तसेच फरक देखील द्यावी अशी मागणी करताच आमदार आवाडेंनी जमणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांना खर्डा भाकरीची भेट स्विकारत ते बंगल्यात निघून जाण्यास गेले. तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी जमणार नसेल तर ऊसाची कांडीला हात लावून देत नसताे असे आमदारांना सुनावले.
खासदार धैर्यशील मानेंच्या दारात ठेवली खर्डा भाकरी
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांना भाऊबीज निमित्त खर्डा भाकरीची भेट देण्यासाठी गेले असता खासदार धैर्यशील माने हे त्यांच्या घरी उपस्थित नव्हते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या दारातच खर्डा भाकरी ठेवली. खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा अपमान केल्याचा महिला कार्यकर्त्यांनी म्हटले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.