Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

Bhandara Accident Death Toll : भंडाऱ्यात लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने ट्रेलरला धडक बसून ५ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत.
Bhandara Accident Death Toll
Bhandara Accident Death TollSaam
Published On

शुभम देशमुख | भंडारा प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Bhandara Accident News: लग्न लावून परत येत असलेल्या वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भंडाऱ्यात भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतकांमध्ये ४ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातानंतर भंडाऱ्यावर शोककळा पसरली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिकांकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.

भंडाऱ्यात वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर २ गंभीर जखमी झाले असून २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील सौंदड येथे दुर्घटना झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील वऱ्हाडी कोंढा येथून विवाह आटोपून घराकडे परत जात होते. त्यावेळीच काळाने घातला.

Bhandara Accident Death Toll
IPL 2026 : संजूचा पॉवर पंच! वानखेडेवर ठोकलं शतक, मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

अपघातग्रस्त व्हॅनमध्ये ९ जण होते. त्यापैकी ५ वऱ्हाड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर असून अन्य दोन किरकोळ जखमी आहेत. गंभीर दोघांना भंडाऱ्याला हलविले तर, किरकोळ दोघांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सौंदड येथे घडली. वऱ्हाड्यांच्या व्हॅन यांचा टायर फुटल्याने जाणाऱ्या ट्रेलरवर व्हॅन धडकून झाला भीषण अपघात.

Bhandara Accident Death Toll
विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

घटनास्थळी अड्याळ पोलीस आणि परिसरातील नागरिकांची मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहनातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.

Bhandara Accident Death Toll
विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com