IPL 2026 : संजूचा पॉवर पंच! वानखेडेवर ठोकलं शतक, मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

Sanju Samson : वानखेडेवर संजू सॅमसनच्या तुफानी शतकाच्या जोरावर चेन्नईने २०७ धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत सॅमसनने आयपीएलमधील ५वे शतक झळकावले.
Sanju Samson
Sanju SamsonSaam
Published On

वानखेडेच्या मैदानावर संजू सॅमसन यानं वादळी फलंदाजी करत शतक ठोकले. पहिल्या चेंडूपासून २० षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत संजूने फलंदाजी केली. संजू सॅमसन याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. संजूच्या शतकी खेळीच्या बळावर चेन्नईने सुपर किंग्सने २०७ धावांचा डोंगर उभारला. संजूने यंदाच्या हंगामातील दुसरे आणि आयपीएलमधील ५ वे शतक ठोकले. संजू सॅमसन यानं आयपीएलमधील सर्वाधिक शतकांमध्ये केएल राहुल याची बरोबरी केली. केएल राहुल आणि संजूच्या नावावर आता प्रत्येकी ५-५ शतके झाली आहेत.

संजू सॅमसनने आयपीएलमध्ये १७९ व्या डावात पाच शतक झळकावले. आयपीएलमधील सर्वाधिक शतकांमध्ये आता विराट कोहली, ख्रिस गेल आणि जोस बटलर हेच फलंदाज पुढे आहेत. विराट कोहलीच्या नावावर ८, जोस बटलर आणि ख्रिस गेल यांनी प्रत्येकी ७-७ शतके ठोकली आहेत. केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी पाच शतके केली आहेत. सॅमसनने मुंबईविरुद्ध १०१ धावा केल्या. जर त्याने आणखी तीन धावा केल्या असत्या, तर त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ५,००० धावांचा टप्पा गाठला असता. फक्त ३ धावांनी त्याचा ५ हजार धावांचा टप्पा हुकलाय. संजू सॅमसन याने ५४ चेंडूत शतक ठोकलेय.

Sanju Samson
Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

संजू सॅमसन याने मुंबईच्या दर्जेदार गोलंदाजांचा समाचार घेतला. संचूने अवघ्या ५४ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. संजू सॅमसने याने बुमराहपासून ते हार्दिक, सँटरनर यांचा चांगलाच समाचार घेतला. संजू सॅमसन याचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. कर्णधार गायकवाड २२, सर्फराज खान १४, डेवॉल्ड ब्रेविस २१, कार्तिक शर्मा १८ यांनी धावांचे योगदान दिले.

Sanju Samson
विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

मुंबईकडून गजनफर यनंसर्वत भेदक मारा केला. त्याने ४ षटकात फक्त २५ धावा खर्च करत २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने ४ षटकात एक विकेट घेत ३१ धावा खर्च केल्या. हार्दिक पांड्याच्या २ षटकात ३८ धावा चेन्नईने वसूल केल्या. सँटनर याने ४ षटकात ४४ धावा खर्च केल्या, तर अश्वीनी कुमारने ४ षटकात ३७ धावा खर्च करत २ विकेट घेतल्या. क्रीश भगत याने २ षटकात ३१ धावा खर्च केल्या, त्याला विकेट घेता आली नाही.

Sanju Samson
bypoll election : बारामती-राहुरी पोट निवडणुकीत किती टक्के लोकांनी केलं मतदान? कोण मारणार बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com