

भंडाऱ्याच्या साकोली न्यायालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या मृत्यूने शोककळा
काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोलिसाचाही मृत्यू
शुभम देशमुख, साम टीव्ही
पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता भंडाऱ्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एका आरोपीला न्यायालयात पेशीवर नेलं असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली न्यायालयात आज सोमवारी दुपारी घडली. किशोर शेळके (५५) असं मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचं नावं आहे.
किशोर शेळके हे भंडारा पोलीस मुख्यालयाच्या बँड पथकात कर्तव्यावर होते. ते आज सोमवारी साकोली पोलीस ठाणे अंतर्गत एका गुन्ह्यातील आरोपीला त्यांनी भंडारा जिल्हा कारागृहातून साकोली न्यायालयात पेशीवर नेलं होतं. शेळके यांना यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा उपचारापूर्वीचं मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सुशील मोहन भांडे यांचं निधन झालं. ते मूळचे पुण्याच्या भोरचे रहिवासी होते. त्यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने भोंगवली गावावर शोककळा पसरली होती. ते मुंबईच्या गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस स्टेसनमध्ये कार्यरत होते. भांडे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांचा बॉडीगार्ड म्हणून काही काळ काम केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.