Bhadgaon Bandh : बालिकेवर लैंगिक अत्याचार, भडगावात तालुक्यात कडकडीत बंद

Jalgaon Crime News: जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करून मृतदेह कडबा कुट्टीत लपवला; नराधम ताब्यात
jalgoan, bhadgaon bandh
jalgoan, bhadgaon bandhsaam tv
Published On: 

Jalgoan News : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंड गाव येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेर्धात आणि संशयितास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी आज (शनिवार) भडगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळला आहे. (Maharashtra News)

jalgoan, bhadgaon bandh
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

या घटनेनंतर केवळ गोंड गावात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा अशी मागणी हाेऊ लागली आहे.

jalgoan, bhadgaon bandh
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

हा खटला चालवण्यासाठी उज्वल निकम यांच्या सारख्या ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. बालिकेच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान आज सर्व पक्षीय तसेच विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला भडगाव तालुक्यातून प्रतिसाद मिळाला आहे. सर्व व्यवहार बंद असून नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने बंदला पाठींबा दर्शविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com