बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Beed crime news : बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार घडला आहे. परळीत दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवण्यात आल्याची घटना घडली आहे.
beed news
Beed crime news Saam tv
Published On

परळीत दिवसाढवळ्या तरुणाचं अपहरण

ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले

परळी शहर पोलिसांकडून ३ आरोपी गजाआड

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या परळी शहरात भरदिवसा एका तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे. ऊसतोडणीच्या कामासाठी घेतलेल्या उचल पैशांच्या वादातून हा गंभीर प्रकार घडला आहे. परळी शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत धडक कारवाई करत ६ पैकी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरात गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाबाबत खळबळ उडाली आहे.

beed news
Pune : पुण्यात धक्कादायक घटना! शेतातलं काम सांगितलं म्हणून नातू संतापला; रागारागात आजोबाची केली हत्या

नेमका वाद काय? आणि घटना कशी घडली?

मिळालेली माहिती अशी की, परळी येथील स्वाभिमाननगरचे रहिवासी विनोद नवनाथ वैरागे यांनी ऊसतोडणीच्या कामासाठी उचल पैसे घेतले होते. याच पैशांच्या आर्थिक व्यवहारावरून परभणी जिल्ह्यातील काही जणांशी त्यांचा वाद सुरू होता. शुक्रवारी (१९ जून) सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास विनोद वैरागे हे परळीतील अरुणोदय मार्केट परिसरात आले होते.

तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना गाठले आणि जुन्या वादावरून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, सर्व आरोपींनी संगनमत करून विनोद वैरागे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 'जीवे मारू' अशी धमकी देत आरोपींनी त्यांना बळजबरीने चारचाकी वाहनात डांबले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

परभणीच्या टोळीवर गुन्हा ३ जण गजाआड

या भरदिवसा झालेल्या अपहरणाच्या घटनेनंतर राजू प्रल्हाद कांबळे (वय ३० वर्षे, रा. सोरंझा, जि. परभणी) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत परभणी जिल्ह्यातील सायखेडा आणि निपाणी येथील ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आप्पाराव उर्फ माऊली उजगरे, सचिन उजगरे, विश्वजित कदम, गिरीधर पुरी, दीपक चव्हाण आणि सचिन कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी यातील तीन प्रमुख आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे.

beed news
Beed Crime : बीड हादरलं! हॉटेल व्यवसायिकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

परळी शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) (अपहरण), ११५(२), ३५१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. नाचण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंगणे हे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. फरार असलेल्या इतर ३ आरोपींचा परळी शहर पोलीस कसून शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com