Pune : पुण्यात धक्कादायक घटना! शेतातलं काम सांगितलं म्हणून नातू संतापला; रागारागात आजोबाची केली हत्या

Pune Crime News : पुणे जिल्ह्यात शेतातील कामांवरून झालेल्या वादातून २६ वर्षीय नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांचा लोखंडी रॉडने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
GRANDSON KILLS 84-YEAR-OLD GRANDFATHER OVER FARM WORK DISPUTE IN PUNE'S SHIRUR
GRANDSON KILLS 84-YEAR-OLD GRANDFATHER OVER FARM WORK DISPUTE IN PUNE'S SHIRURSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक गावात धक्कादायक घटना

  • शेतातील कामांवरून झालेल्या वादातून नातवाने आजोबांची हत्या केली

  • आरोपीला शिरूर पोलिसांनी काही तासांत अटक केली

  • पुढील तपास सुरू आहे

रोहिदास गडगे, पुणे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील कामांवरून झालेल्या वादातून २६ वर्षीय नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांचा लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाभुळसर बुद्रुक येथील दशरथ यशवंत राऊत हे आपल्या कुटुंबासह राहत होते. शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय होता. सोमवारी शेतातील काही कामे करण्यासाठी त्यांनी आपला नातू सोमनाथ बाळासाहेब राऊत याला सांगितलं. मात्र, यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला.

GRANDSON KILLS 84-YEAR-OLD GRANDFATHER OVER FARM WORK DISPUTE IN PUNE'S SHIRUR
Monsoon Update : उकाड्याने नागरिक हैराण! मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाचा वर्तवला अंदाज

रागाच्या भरात सोमनाथने जवळ असलेल्या लोखंडी रॉडने आपल्या आजोबांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर वारंवार वार केले. या गंभीर मारहाणीत दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती शिरूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची सूत्रे हाती घेतली.

GRANDSON KILLS 84-YEAR-OLD GRANDFATHER OVER FARM WORK DISPUTE IN PUNE'S SHIRUR
Maharashtra Politics : महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर जोरात! बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ; शिंदेसेनेत केला प्रवेश

शिरूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत शेतातील कामांबाबत झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com