Beed Shocking : बीडमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; मारहाणीनंतर उपाशी ठेवत घरातून हाकललं

Beed crime news : बीडमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याची घटना घडली आहे. महिलेला मारहाणीनंतर उपाशी ठेवत घरातून हाकलल्याचाही प्रकार घडला.
beed news
beed Saam tv
Published On

बीडमध्ये पुन्हा घडला धक्कादायक प्रकार

हुंड्यासाठी मारहाण करून विवाहितेला घरातून हाकलले

तीन लाखांसाठी उपाशी ठेवत केली जबर मारहाण

योगेश काशिद, साम टीव्ही

राज्यात महिला अत्याचारांच्या घटना थांबेना झाल्या आहेत. बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडच्या गेवराईत २० वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडमध्ये विवाहितेचा ३ लाखांसाठी अमानुष मारहाण करून छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीडमध्ये कर्ज फेडण्यासाठी भावाकडून 3 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. पैसे आणण्यास असमर्थता दर्शविल्याने पती आणि सासूने विवाहितेला उपाशी ठेवून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

मारहाणीनंतर विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलल्याचा देखील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात पती शफीक आणि सासू रेहाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

beed news
Beed : बीड पुन्हा हादरले! संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; दोरीने बांधून तरुणाला बेदम मारहाण, दुकानातच केला खून

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी बीडच्या गेवराईत २० वर्षीय नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पूजा प्रमोद सुरवसे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पूजाने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. नवऱ्याने व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याची तक्रार आहे. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचाही आरोप आहे.

beed news
Shocking : बीड हादरलं! २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या; कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण

पूजाने टोकाचं पाऊल का उचललं?

पूजा त्रास आणि छळामुळे खचून गेली होती. सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com