कामावर गेला, परत आलाच नाही, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; निधनाचे वृत्त कळताच आईने...

Beed Shocker: मस्साजोग गावातील महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू. तरूणाच्या पश्चात फक्त आई. गावात शोककळा.
Beed Shocker
Beed ShockerSaam
Published On
Summary
  • विजेचा धक्का लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू.

  • अमोल लव्हाळे (वय २८) असं कर्मचाऱ्याचे नाव.

  • मस्साजोग गावचा रहिवासी.

  • गावात शोककळा.

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजेचा धक्का लागून महावितरण कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मस्साजोगमध्ये शोककळा पसरली. तरूणाच्या पश्चात फक्त आई आहे. दरम्यान, तरूणाच्या आईला आर्थिक मदत करण्याची मागणी मस्साजोगसह पंचक्रोशीतील मित्र परिवाराकडून होत आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मित्रपवार मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे.

अमोल लव्हाळे (वय वर्ष २८) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो मस्साजोगचे केज तालुक्यातील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी तरूण महावितरण विद्युत केंद्र येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेला होता. मात्र, कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Beed Shocker
'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

याघटनेनंतर संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला शवविच्छदनासाठी केज येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. अमोल लव्हाळे हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या पश्चात आई आहे. त्याच्यावर घराची जबाबदारी होती.

Beed Shocker
नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?

महावितरण प्रशासनाने या घटनेचा पंचनामा केला आहे. अमोल लव्हाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी मस्साजोगसह पंचक्रोशीतील मित्र परिवाराकडून होत आहे. अमोल लव्हाळे यांच्या पार्थिवावर मस्साजोग येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com