'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Sanjay Raut Slams Shinde Sena: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. 'ठाणे यांच्या बापाची आहे का?', असा सवाल करत खडेबोल सुनावले.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv
Published On
Summary
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिंदे गटावर कडाडले.

  • 'ठाणे यांच्या बापाची आहे का?'

  • सवाल करत राऊतांनी खडेबोल सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये शुभेच्छा देणारी जाहिरात छापण्यात आली. त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला होता. 'बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय?', असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. यानंतर शिवसैनिक चांगलीच आक्रमक झाली. यानंतर आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी तोच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर टीकेची तोफ डागली.

पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, 'ठाणे यांच्या बापाची आहे का? ठाणे ही शिवसेना, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आहे. यांच्या शिवसेनेची नाही', असं राऊत म्हणाले. 'कालचं मी केलेलं विधान अत्यंत जबाबदारीनं केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला मिरच्या लागाच्या आहेत, त्या लागल्या आहेत', असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड

'तुम्ही आनंद दिघे यांचा फोटो मोदींपेक्षा मोठा घ्या ना. पंतप्रधान मोदींना मोठे ठरवणे तर, बाळासाहेबांना छोटे ठरवणे, ही भाजपची रणनिती आहे', असाही घणाघात संजय राऊतांनी केला. 'काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो. हे सर्व गद्दार आहेत, हे सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले एक नंबरचे गद्दार आहेत. देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही', असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

'आनंद दिघे यांनी कधी शिवसेना विकलेली नाही. आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, त्यांच्यावर टाडाही लावण्यात आला. परंतु त्यांनी कधीही पक्षांतर केलं नाही', असं राऊत म्हणाले. त्यांच्या नावाचं राजकारण सुरू आहे, असा आरोपही राऊतांनी केला. 'आनंद दिघे हे ठाकरे परिवार आणि शिवसेनेचे एक महत्त्वाचे घटक होते. ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही, त्यांनी सातत्याने मातोश्रीशी आपले निष्ठा कायम ठेवली होती', असं म्हणत राऊतांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Sanjay Raut
म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com