Beed News: '..तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री असतील', मराठा आरक्षणासाठी तरुण चढला टॉवरवर

Maratha Reservation Protest: '..तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री असतील', मराठा आरक्षणासाठी तरुण चढला टॉवरवर
Beed News
Beed NewsSaam Tv

Beed News:

बीडच्या वाहिरा येथील तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसह गावातील विविध मागण्यांसाठी, आष्टी तालुक्यातील कासारी गावातील जिओच्या टावरवर चढून बसलाय.

गेल्या दोन दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, या तरुणाचं रात्री देखील हे आंदोलन सुरूच आहे. अशोक माने असं आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Beed News
Special Session of Parliament: मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा झाला स्पष्ट, सरकार मांडणार महत्वाचे 4 बिल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

वाहिरा गावातील अशोक माने यांनी मराठा आरक्षणासह वाहिरा गावातील रस्ता आणि विविध समस्या बाबत कालपासून टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. (Latest Marathi News)

गेल्या एक वर्षापासून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन देऊनही त्याची कोणतीच दखल घेतली नाही. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लागत नाही. यामुळे अशोक माने या तरुणाने संतप्त होत, शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

Beed News
Maratha Andolan: शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाचा मनोज जरांगे भेटीचा दौरा रद्द; कारण काय?

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी माझ्याकडे अध्याप आला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांनी देखील आंदोलनाची दखल घेतली नाही. यामुळे आता मी जर काही केलं, तर याला राज्याचे मुख्यमंत्री आणि बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या जबाबदार असतील. असा संतप्त आणि टोकाचा इशारा शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या अशोक माने यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com