Special Session of Parliament: मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा झाला स्पष्ट, सरकार मांडणार महत्वाचे 4 बिल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Modi Government: मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा झाला स्पष्ट, सरकार मांडणार महत्वाचे 4 बिल; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Special Session of Parliament
Special Session of Parliament SAAM TV
Published On

Special Session of Parliament Updated News:

केंद्र सरकारने 18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात येत आहे, याचा अजेंडा काय आहे, असे अनेक प्रश्न विरोधी पक्षांनी विचारले होते. तसेच सरकार विरोधी पक्षांना अंधारात ठेवत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता या अधिवेशन संदर्भात महत्वाची माहिती जाहीर केली आहे.

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या बुलेटिननुसार, संविधान सभेपासून सुरू झालेल्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासावर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा होणार आहे. तसेच या विशेष अधिवेशनात चार महत्वाचे विधेयक सरकारच्या वतीने मांडण्यात येऊ शकतात.

Special Session of Parliament
Jammu and Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमकीत कर्नलसह 3 अधिकारी शहीद, राजौरीमध्ये 2 दहशतवादी ठार

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये अधिवक्ता (सुधारणा) विधेयक 2023 आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 यांचा समावेश आहे, जे लोकसभेत सादर केले जातील. हे विधेयक 3 ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले.

याशिवाय पोस्ट ऑफिस विधेयक 2023, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा कालावधी) विधेयक 2023 वर राज्यसभेत चर्चा केली जाईल. ही दोन्ही विधेयके 10 ऑगस्ट रोजी राज्यसभेत मांडण्यात आली होती. (Latest Marathi News)

Special Session of Parliament
India Alliance Meeting: दिल्लीत 'इंडिया आघाडी'च्या समन्वय समितीची पहिली बैठक, जागावाटपाबाबत काय झाला निर्णय?

याशिवाय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर चर्चा होणार आहे. तर चांद्रयान-3 मिशन आणि जी-20 शिखर परिषदेवर प्रस्ताव आणले जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com