आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स'च्या (इंडिया) समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. मात्र या बैठकीतही जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत भविष्यातील रणनीती, जागा समन्वय, निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम, जाहीर सभा यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली.
बैठकीला कोण-कोण होते उपस्थित?
या बैठकीला शरद पवार यांच्याशिवाय काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे टीआर बाळू, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, जनता दलचे संजय झा, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत, राष्ट्रीय उमर अब्दुल्ला हे उपस्थित होते. यासोबतच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) मेहबुबा मुफ्ती, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) डी. राजा, समाजवादी पक्षाचे जावेद अली खान देखील या बैठकीला उपस्थित होते. (Latest Marathi News)
के सी वेणुगोपाल यांनी विरोधी आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर सांगितले की, इंडिया आघाडी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमधून संयुक्त जाहीर सभा सुरू करेल. ते म्हणाले की, इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करतील आणि त्यावर लवकरात लवकर निर्णय घेतील.
वेणुगोपाल म्हणाले की, इंडिया आघाडीने जातीच्या जनगणनेचा मुद्दा उचलण्यास सहमती दर्शविली आहे. ते पुढे म्हणाले की, ''समिती जागावाटप निश्चित करण्याची प्रक्रिया देखील सुरू करेल".
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.