चित्रपटांमध्ये अनेकदा आपण बघतो की, कधी कधी आई वडिलांना आपलं मूल नकोसं असतं, मग ते मूलाला मंदिरात सोडून निघून जातात. मग कुणीतरी दयाळू व्यक्ती येते आणि या बालकाला घेऊन जाते. त्यानंतर ते बाळ मोठं होतं आणि आपल्या आईवडिलांचा शोध घेतं. पण खऱ्या आयुष्यात असं घडलं तर? अशीच एक घटना बीडमध्ये समोर आली आहे. (Latest Marathi News)
फ्रान्समधील नेहा आसांते ( Neha Asante) नावाची तरूणी आईवडिलांच्या शोधात परळीत दाखल झाली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर ती तिच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेत (Beed News) आहे. आता ही नेहा आसांते कोण आहे, तिची काय कहाणी आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तरूणी घेतेय आई-वडिलांचा शोध
21 वर्षांपूर्वी बीडच्या परळीतील (Parli) वैद्यनाथ मंदिर परिसरात निर्दयी एका जोडप्याने आपल्या चिमुकल्या मुलीला मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवून पळ काढला होता. आता ती मुलगी फ्रान्सहून आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या शोधात परळीमध्ये दाखल झाली आहे. नेहा आसांते, असं या मुलीचे नाव (Girl Searching Parents) आहे. तिचे सांत्वन आणि जबाबदारी फ्रान्स येथील कुटुंबांनी घेतली. आता 21 वर्षानंतर नेहा आपल्या मूळ जन्मदात्या आईवडिलांच्या शोधात परळीत आलीय.
8 जून 2002 रोजी परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात टोपलीमध्ये एक लहान बाळ मंदिराचे तत्कालीन लेखापाल विनायक खिस्ते यांना आढळून आलं होतं. याची माहिती त्यांनी परळी पोलिसांना दिली. यानंतर हे बाळ बालकाश्रम पंढरपूर येथे दाखल करण्यात आलं होतं.
2020 पासून शोधकार्यास सुरुवात
त्या लहान बाळाला तेथून 29 जून 2002 रोजी प्रीतम मंदिर पुणे या संस्थेत दाखल करण्यात आलं. तेथून तिला फ्रान्समधील आसांते (France) नावाच्या दांपत्यानं दत्तक घेतलं. यानंतर तिचं पालन पोषण केलं. तिचा सांभाळ केला. तिला मोठं केलं. आज 21 वर्षानंतर नेहा आपले जन्मदाते आईवडील कोण आहेत? याचा शोध घेत परळीत आली आहे.
यासाठी अॅडव्होकेट अंजली पवार यांनी 2020 पासून शोधकार्यास (Searching Parents) सुरुवात केली होती. अंबाजोगाईचे दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने विनायक खीस्ते यांचा शोध घेतला. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड देखील शोधण्यात आलं. या मुलीबाबत ज्यांना कुणास माहिती असेल, त्यांनी अंजली पवार यांना संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.