Statistics of Missing Women: राज्यासह संपूर्ण देशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र निर्भया, श्रद्धा वालकर आणि अशा अनेक विचित्र घटना थांबता थांबत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे पोलिस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १३.१३ लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. यातील सर्वाधिक मुली, महिला मध्य प्रदेशातील आहेत. मध्य प्रदेशात सर्वाधिक १,६०, १८० महिला आणि ३८,२३४ मुली या काळात बेपत्ता झाल्या आहेत.
NCRB ने ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. एनसीआरबीच्या माहितीनुसार, मगील ३ वर्षांत देशात १३ लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत. १३ लाख महिलांमध्ये १० लाख महिला या १८ वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या आहेत. तर, १८ लाखांपेक्षा कमी वयाच्या अडीच लाख मुली बेपत्ता आहेत. सर्वात जास्त महिला मध्यप्रदेधातून गायब झाल्यात. तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगालचा नंबर आहे. पश्चिम बंगालमधून देखील महिला जास्त प्रमाणात गायब होत आहेत.
महाराष्ट्रातील बेपत्ता मुली आणि महिला किती?
महिला आणि मुली बेपत्ता (Missing Girls) होण्यात महाराष्ट्र (Maharashtra) तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात १ लाख ७८ हजार ४०० महिला तर १३ हजार मुली गायब झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार, १० लाख ६१ हजार ६४८ महिला अठरा वर्षांवरील असून २ लाख ५१ हजार ४३० मुली या अठरा वर्षांखालील आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी संकलित केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.