Mumbai Dam Water Level: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, पाणीपुरवठा करणारे ४ धरणं ओव्हर फ्लो; पाणीकपातीचं संकट टळणार?

Mumbai Dam Water Level News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. तानसा धरणात ९४.२७ टक्के, विहार धरणात ९७ टक्के आणि तुळसी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे.
Mumbai Dam Water Level 4 major dams overflow to supplying water to Mumbai Modaksagar dam 100 percent full
Mumbai Dam Water Level 4 major dams overflow to supplying water to Mumbai Modaksagar dam 100 percent full Saam TV
Published On

Mumbai Dam Water Level News Today: भर पावसाळ्यात पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण ओव्हर फ्लो झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाण्याची आवक वाढत आहे.

Mumbai Dam Water Level 4 major dams overflow to supplying water to Mumbai Modaksagar dam 100 percent full
Maharashtra Weather Alert: पुढील २४ तास महत्वाचे, राज्यातील 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार

अशातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. तानसा धरणात ९४.२७ टक्के, विहार धरणात ९७ टक्के आणि तुळसी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. आता मोडक सागर तलाव देखील तुडुंब भरल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे धरणातून ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने ट्विट करत दिली आहे.

धामणी धरण १०० टक्के भरलं, सूर्या नदीला पूर

दरम्यान, वसई विरार महानगरपालिका तारापूर औद्योगिक वसाहत तसेच पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणारे धामणी धरण १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला महापूर आला आहे.

धामणी मधून ३६ हजार ५४५ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर धामणी धरणाच्या खालोखाल असलेले कवडास धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालं असून धरणातून ८००० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणाच्या विसर्गाने सूर्या नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावाना सर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com