Dhananjay Munde Vs Aaditya Thackeray : शेतात या! आदित्य ठाकरेंना धनंजय मुंडेंचे थेट चॅलेंज, VIDEO

Beed News : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील लोणावळा या गावाच्या परिसरात बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधत पिकाची पाहणी केली
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : आदित्य ठाकरे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले, त्यांना शेती काय माहित नाही. त्यांना शेती आणि कृषिमंत्री बघायचा असेल; तर एकदा तिफनीवर यावं, एका धुरीत त्यांनी माझासोबत तिफन चालवावे. हे सगळ्यांनी बघावं मग कळेल खरा शेतकरी कोण?; असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. 

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गेवराई तालुक्यातील लोणावळा या गावाच्या परिसरात बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधत पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत समवेत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यासह गेवराई तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. 

Beed News
Washim News : स्टंटबाजी करत अडाण नदीत उडी; पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा ४८ तासानंतर लागला शोध

बांधावर येऊन केवळ फोटोशूट करता 

एक दिवस चार्टर्ड फ्लाईटने यायचं आणि शेतकऱ्याच्या बांधावर शूट करायचं. पुतना मावशीचे प्रेम दाखवायचं. शेतकऱ्यांना हे सारं कळतं. ज्यांना निसर्ग कळतो त्यांना कृषिमंत्री कोण हे माहित आहे. आम्ही बांधावरचे आहोत तुम्ही बांधावर येऊन फोटोशूट करता. आम्ही रोजच बांधावर असतो. गलिच्छ राजकारणात पडायचं नाही, माझ्या दृष्टीने आज शेतकरी संकटात असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.  

Beed News
Nalasopara Crime : गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी नव्हते पैसे; बांधकाम ठेकेदाराच्या घरी जात केलं भयानक कृत्य

शेतकऱ्यांना मदत करणार 
मी शेतीची पाहणी करत आहे. त्यावेळी माझा मोबाईल गाडीत होता. त्यामुळे जरांगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेही बांधावर आहेत, मीही बांधावर आहे. त्यांची आणि माझी चर्चा झाली. एक कृषी मंत्री म्हणून त्यांनी मला याबाबत विचारणा साहजिक आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी आम्ही बांधीला आहोत. शेतकऱ्यांना संकटात एकटे सोडणार नाही. सरकार म्हणून आम्ही या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि शेतकऱ्यांना लागेल ती मदत देखील करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com