महेंद्र वानखेडे
नालासोपारा : पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एका बांधकाम ठेकेदाराची झालेल्या हत्येची घटना घडली होती. या घटनेचा उलगडा करण्यात युनिट ३ च्या पोलिसांना यश आले आहे. गहाण ठेवलेली दुचाकी सोडविण्यासाठी बांधकाम ठेकेदाराची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला वाराणसी येथून ताब्यात घेतले आहे.
वाराणसी येथे राहणारा समीर कुमार बिंद हा संशयित आरोपी कामानिमित्ताने (Nalasopara) नालासोपारा परिसरात आला होता. त्याने वाराणसीहून येताना आपली दुचाकी २५ हजार रुपयांत गहाण ठेवली होती. नालासोपारा येथे आल्यानंतर त्याने हे सर्व पैसे जुगारात लावले व यात तो हरला होता. यामुळे त्याच्याजवळ वाराणसीला परत जाण्यासाठी देखील पैसे नव्हते.
पुन्हा वाराणसी येथे त्याला जायचे व गहाण ठेवलेली दुचाकी सोडवायसाठी पैसे नव्हते. दरम्यान त्याच्या ओळखीचा ठेकेदार प्रमोद कुमार बींद याकडे कायम पैसे असायचे, हे त्याला माहीत होते. त्यामुळे समीर बिंद हा (Crime News) बांधकाम ठेकेदाराच्या घरी गेला व त्याची हत्या केली. तसेच त्याकडे असलेले पैसे घेऊन पळ काढला होता. या घटनेबाबत तपस करत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीने मीरा- भाईंदर पोलिसांच्या क्राईम युनिट ३ च्या पोलिसांनी संशयित आरोपीला वाराणसी येथून अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.