Beed News: जिजाऊ मल्टिस्टेट बँकेचा 100 कोटींचा घोटाळा; 51 स्थावर मालमत्ता होणार जप्त

Beed News: अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने हजारो ठेवीदारांची 100 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे
Beed News
Beed NewsSaam Digital
Published On: 

Beed News

बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट बँकेने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक घोटाळा केला आहे. त्यामुळे बीड, नेकनूर आणि ईट या 3 ठिकाणी जिजाऊ मल्टिस्टेट बँकेच्या अध्यक्षा आरोपी अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनिष बबन शिंदे व्यवस्थापक अश्विनी वांढारे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या स्थावर मालमत्ता एमपीआयडी कायद्यानुसार जप्त करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात कारवाई होणार असल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Ashok Chavan News: 'लोकांच्या भावना तीव्र, शासनाने आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा..' कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मागणी

अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने हजारो ठेवीदारांची 100 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. यामुळे आता या गुन्ह्यातील आरोपी अनिता शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, व्यवस्थापक अश्विनी वांढरे यांच्यासह आदींच्या मालमत्तेची माहिती जमा करण्यात आली आहे. 51 स्थावर मालमत्ता जप्तीसाठी व एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने प्रस्ताव तयार करून हालचाली सुरू केल्या आहेत.

Beed News
Ashok Chavan News: 'लोकांच्या भावना तीव्र, शासनाने आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा..' कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.