संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील युवक आत्महत्या करताना दिसत आहेत. शनिवारी (२१, ऑक्टोंबर) नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून आरक्षणासंबंधी सरकारने लवकर निर्णय घ्यावा.. अशी मागणी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
मराठा आरक्षणासाठी आज नांदेडमध्ये (Nanded) एका युवकाने आत्महत्या केली. ही घटना दुःखद असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. "आता तरी सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा. लोकांच्या भावनांचा उद्रेक वाढत आहे. जरांगे पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. यावरून कल्पना येते की लोकांच्या भावना तीव्र आहेत," असे अशोक चव्हाण म्हणाले.
तसेच यावेळी पुढे बोलताना "जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सरकारने दिलेली मुदत दोन दिवसात संपणार आहे. पण सरकारकडून आरक्षणाबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले जात नाही, त्यामुळे लोकांमध्ये रोष आणि नाराजी आहे.." असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ईडब्ल्यूएसच्या जाहिरातीमुळे संभ्रम...
"राज्य सरकारकडून आज वृत्तपत्रात ईडब्ल्यूएसची (EWS) जाहिरात देण्यात आली आहे. शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या संधीचे सोन करा अशा आशयाची ही जाहिरात आहे. यावरूनही काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. आरक्षण मिळवण्याकरिता सर्व शक्यता मावळल्या, म्हणुन हा पर्याय तूम्ही सुचवता का?" असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी सरकारला विचारला.
तसेच "ईडब्ल्यूएसच्या सवलती देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीने घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने आरक्षण मिळेपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना म्हणुन आम्ही 2020 साली हा निर्णय घेतल्याचे म्हणत या जाहिरातीमुळे संभ्रम निर्माण झाला असून आरक्षण देणार की नाही हे जाहीर करा," असे अशोक चव्हाण म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.