Beed News: अभिनेता सोनू सुदच्या (Sonu Sood) नावाखाली 69 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. बीडच्या पैठण केजमध्ये तलावात बुडून एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या कुटुंबाला अनेकांनी आर्थिक मदत केली होती. याच आर्थिक मदतीवर या भामट्यांनी ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आहे. बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या (Beed News) केज तालुक्यातील पैठण येथे 21 मार्च रोजी जयराम हरिभाऊ चौधरी यांच्या मुलासह दोन पुतण्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने नातेवाईक, मित्र परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आर्थिक मदत केली. याच पैशांवर सायबर भामट्यांचा डोळा होता.
30 मार्च रोजी जयराम यांना सोनू सूद फाउंडेशन कार्यालयातून बोलत असल्याचा एक कॉल आला. "तुम्हाला 3 लाख रुपयांची मदत करायची असून मी विचारलेली माहिती सांगा, असे सांगण्यात आले. त्यांना मोबाइलमध्ये एनी डेस्क अँप डाऊनलोड करायला लावून पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, बैंक पासबुक आदींची माहिती घेतली.
नंतर वेगवेगळे ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून 10 हजार, 9 हजार 999, 18 हजार 321, 18 हजार 297, 5 हजार, 4 हजार 800 आणि 3 हजार 49 असे 69 हजार 566 रुपये ऑनलाइन काढून घेतले. पैसे कट झाल्याचे समजताच चौधरी यांनी परत त्याच क्रमांकावर कॉल केला. परंतु तो नंबर बंद होता. त्यावरुन आपली फसवणूक (Online Fraud) झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी आगोदर युसूफवडगाव आणि नंतर सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. दरम्यान याप्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.