Chhatrapati Sambhajinagar News: महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) पहिली जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या जाहीर सभेचे टीझरही महाविकास आघाडीने प्रदर्शित केला होता. ज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.
एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा असतानाच त्याचवेळी संभाजीनगरमधून भाजप- शिवसेनेची (शिंदेगट) सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाचे ठिकाण एकाच भागात आहे आणि वेळ ही एकच आहे, त्यामुळे संभाजीनगरमध्ये आज पॉलिटिकल संडे पाहायला मिळणार आहे.. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा आज (2 एप्रिल) पार पडत आहे. साधारण संध्याकाळी 5 वाजता या सभेला सुरूवात होईल. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिसरातील वाहतूकीत देखील मोठा बदल केला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा होत असताना, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे (Shivsena) शहरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सभेसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. देशात राजकीय पक्ष प्रेरणा घेतील अशा मुद्द्यांवर सभा होईल, घोषणाबाज सरकारला या सभेतून जोरदार उत्तर मिळेल, अशी माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. यावेळी सभेत तिन्ही पक्षातील दोन दोन नेत्यांची भाषणे होतील, संविधानाच संरक्षण करण्याची भूमिका या सभेतून मांडली जाणार आहे, असल्याचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सांगितले आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.