बायको नांदायला येत नाही म्हणून डोक्यात राग शिरला; हैवान बाप पोरांच्या जिवावर उठला

Beed Crime News: बीड माजलगावमधील एका धक्कादायक घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्याच मुलांना जिंवत पेटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
Tension grips Beed village after shocking family violence incident involving children.
Tension grips Beed village after shocking family violence incident involving children.
Published On
Summary
  • बीडमधील माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना

  • कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलांवर हल्ल्याचा प्रयत्न

  • आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Tension grips Beed village after shocking family violence incident involving children.
Nashik : नाशिक पुन्हा हादरलं! खासगी कोचिंग क्लासमध्ये १०वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षिकेच्या भाच्याने रूममध्ये नेलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, महेश सामसे असे आरोपी वडिलांचे नाव असून त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहत होती. पत्नी नांदायला येत नसल्यामुळे महेश सामसे हा मानसिक तणावात होता. याच रागातून त्याने आपल्या दोन लहान मुलांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Tension grips Beed village after shocking family violence incident involving children.
Crime News: गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे नको ते व्हिडिओ; बायकोचे ते व्हिडिओ पाहून घेतला टोकाचा निर्णय

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून मुलांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये कारवाई सुरू केली आहे. घटनेचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून स्वतःच्या लेकरांच्याच जीवावर उठण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com